पोस्ट्स

Environment लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जलसंकटावर मात करणारा बेंगळुरू येथील एक पथदर्शी लोकप्रकल्प

इमेज
एकेकाळी तलावांचे शहर आणि गार्डन सिटी म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू शहर आज एका भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. या संकटावर मात करण्यासाठी बेंगळुरूमधील नागरिकांनी आणि काही स्वयंसेवी संस्थांनी मिळून एक आगळीवेगळी चळवळ सुरू केली आहे, ती म्हणजे अ मिलियन वेल्स फॉर बेंगळुरू (A Million Wells for Bengaluru). म्हणजे विशिष्ट प्रकारच्या दहा लाख विहिरी या शहरात खोदण्याचा प्रकल्प. उपक्रमाची पार्श्वभूमी: काळाची गरज अपुर्या पाणी-पुरवठ्यामुळे लोक भूजलाचा प्रचंड उपसा करू लागले. हजारो फूट खोल बोअरवेल्स खोदल्या गेल्या. त्यामुळे भूजल पातळी अत्यंत खालावली. या पार्श्वभूमीवर, बायोम एन्व्हायर्नमेंटल ट्रस्ट आणि फ्रेंड्स ऑफ लेक्स यांसारख्या संस्थांनी मिळून हा उपक्रम हाती घेतला. शहरात १० लाख विहिरी पुनर्भरण खोदण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. विहीर पुनर्भरण म्हणजे काय? विहीर पुनर्भरण या प्रकल्पात विहीर साधारणतः १० ते ३० फूट खोल असते आणि तिचा उद्देश पावसाचे पाणी जमिनीच्या पोटात उतरवणे हा असतो. घराच्या छतावर किंवा रस्त्यांवर पडणारे पावसाचे पाणी गाळून या विहिरींमध्ये सोडले जाते. हे पाणी थेट उथळ भूजल स्तरात ...

'चेलुवी' : मुलीचे फुलझाड बनते तेव्हा... निसर्गाची आणि स्त्रीत्वाची भावस्पर्शी लोककथा

इमेज
'चेलुवी' हा १९९२ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट सुप्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केला आहे. (हा चित्रपट नंतर कन्नड भाषेतही डब करण्यात आला). मुख्य भूमिकेत असलेल्या सोनाली कुलकर्णी यांचा हा पहिला चित्रपट. सोबत सुषमा, गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पर्यावरण संवर्धन यावरील सर्वोत्तम चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता. हा चित्रपट कर्नाटक राज्यातील फुलणारे झाड- एका स्त्रीची कहाणी या पारंपारिक लोककथेवर आधारित आहे. हा चित्रपट निसर्ग, स्त्री आणि सामाजिक शोषण यावर गंभीर भाष्य करतो. संवेदनशील लोककथेवर आधारित चित्रपट 'चेलुवी' ही गरीब कुटुंबातील तरुणी आहे. ती आपल्या आई आणि बहिणीसोबत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहते. एका साधूने दिलेल्या मंत्रामुळे चेलुवीला एक गुप्त आणि जादुई शक्ती प्राप्त होते. ती स्वतःचे रूपांतरण एका सुगंधित फुलांनी बहरलेल्या झाडात करू शकते. पैसे मिळवण्यासाठी ती या मंत्राचा उपयोग करते. तिच्या झाडाला भरपूर सुगंधी फुले येतात. तिची बहीण अत्यंत काळजीपूर्वक ही फुले गोळा करते. दोघीही त...

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)

इमेज
Pixhere आजच्या काळात पर्यावरणीय समस्यांमुळे पर्यावरण आणि पारिस्थितिकी या दोन संकल्पनांबद्दल जागरूकता वाढली आहे. आपण जेव्हा पर्यावरणाबद्दल बोलतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात पारिस्थितिकीय संतुलन बिघडण्याबद्दल बोलत असतो. पर्यावरण आणि पारिस्थितिकी या दोन संकल्पनांमध्ये अनेकदा गोंधळ होतो. पण प्रत्यक्षात या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण फरक आहे. पर्यावरण (Environment) ही व्यापक संकल्पना आहे. पर्यावरण हे आपल्या सभोवतालचे सर्व काही आहे. यात जैविक (सर्व सजीव) आणि अजैविक (हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटक दोन्ही समाविष्ट आहेत. यात निसर्ग, मानवनिर्मित वातावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक हे घटकही समाविष्ट असतात. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती, ज्यात आपण राहतो, काम करतो आणि खेळतो. पारिस्थितिकी (Ecology) ही विज्ञानाची, जीवशास्त्राची एक शाखा आहे. या शाखेत सजीवांचा एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध यांचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाते. पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते, त्यास परिसंस्था (Ecosystem) असे म्हणतात. या दोन संकल्पनामध्ये दोघांमध्ये महत्वाचा...

मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची चांगली पद्धत कोणती?

इमेज
फोटो- विकिमेडीया कॉमन्स  जगभरात मृत्युनंतर मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. या पद्धतीं धार्मिक, सांस्कृतिक, आणि प्रादेशिक परंपरां यावरून तयार झाल्या असतात. जगात प्रचलित असलेल्या अंत्यसंस्काराच्या काही प्रमुख पद्धती आपण येथे पाहणार आहोत. त्यापैकी कोणती पद्धत चांगली व अनुकरण करण्याजोगी आहे, याचाही विचार करायचा आहे. परंतु अंत्यसंस्काराच्या पद्धती धर्माला जोडून असल्यामुळे लोक यावर काय भूमिका घेतील हेही महत्त्वाचे आहे. दहन (Cremation) अर्थात मृतदेहाला जाळण्याची पद्धत हिंदू, बौद्ध, आणि शीख धर्मात प्रचलित आहे. देह पूर्णपणे जाळल्यावर शरीराची राख नदीत विसर्जित केली जाते किंवा विशेषत: राखेसाठी ठरवलेल्या खास ठिकाणी ठेवली जाते. या पद्धतीत शरीराचे जलद विघटन होते. अंत्यसंस्काराची प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होते. शरीरातील अनेक जंतू या प्रक्रियेत नष्ट होतात. यामुळे कोरोनाच्या काळात मृत रुग्णाच्या शरीराचे दहन केले जात होते. काही जण राखेला विशेष स्मारकात ठेवतात किंवा विशेष ठिकाणी विसर्जित करतात. या प्रकारात जागेची बचत होते, एकाच ठिकाणी अनेक मृतदेहाचे दहन करता येते. देह पुरण...

पर्यावरण संवर्धनासाठी मिनिमलिझमची तीव्र गरज

इमेज
PxHere   जागतिक तापमान वाढीचे परिणाम दिवसेंदिवस तीव्र होऊ लागले आहे. बेताल पाऊस, ढगफुटी, महापूर, ठिकठिकाणी तुंबणारे पाणी, भूस्खलन इत्यादी संकटे तापमान वाढीने बिघडलेल्या पर्यावरणाची निष्पत्ती आहे. मानवाने विकासाच्या नावावर पर्यावरणाची जी अपरिमित हानी केली, निसर्गाची अपरिमित लूट केली - त्याचे परिणाम या संकटांच्या रूपाने आपण भोगतो आहोत. हे संकट अगदी आपल्या नाकातोंडापर्यंत येऊनही त्यावर गंभीर्याने विचार व कृती केली जात नाही. ‘युज अँड थ्रो’ च्या जमान्यात आपण नको तितक्या वस्तूंचा उपयोग करतो व तपमान वाढीस हातभार लावतो. आपण वापरत असलेल्या वस्तूंच्या निर्मितीसाठी व वाहतुकीसाठी ऊर्जेचा वापर होतो. यामुळे पृथ्वीच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अश्याच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हरितगृह परिणाम (GREENHOUSE EFFECT) निर्माण होतो व पृथ्वीच्या तापमानात वाढ होत जाते. अशा वस्तूंचा वापर कमी करणे म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनास मदत करणे होय. विसाव्या शतकात जगभर - कमीत कमी वस्तू वापरत, किमान गरजा भागवत आयुष्य व्यतीत करणे यासाठी मिनिमलिझम नावाच्या चळवळीला सु...

प्रकाशाच्या प्रदूषणामुळे जागतिक पर्यावरण धोक्यात!

इमेज
World in Light Pollution. Photo- Flicker सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गावाबाहेरील झाडाझुडपांवर मे-जून या महिन्यात रात्रीच्या वेळी काजव्यांचा लखलखाट सहज बघायला मिळायचा. इतकेच नव्हे तर, घराच्या अंगणातील झाडावरही काजवे त्यांचे दर्शन देऊन जायचे. निसर्गातील माणसांच्या हस्तक्षेपामुळे काजवे लोकवस्तीपासून दूर जायला लागले. मग काजवे बघण्यासाठी पर्यटन उद्योगाने खास “काजवा महोत्सव” सुरू केले. हजारो- लाखोंच्या संख्येने पर्यटक काजवा महोत्सवासाठी काजव्यांच्या निवासस्थानी एक-दोन रात्रीची वस्ती करून राहायला लागले. राहण्यासाठी तंबू, विजेचे दिवे, मोबाईलचे फ्लॅश, बॅटरीचे झोत, कॅमेऱ्याचे फ्लॅश, व्यवसायिक फोटोग्राफर, पर्यटकांच्या गाड्यांचे झगझगीत दिवे इत्यादींच्या प्रकाशाच्या प्रदूषणाने काजव्यांच्या आयुष्यावर परिणाम केला आणि काजवा महोत्सवापासून काजवे दूर जायला लागले. काजव्यांच्या व बारीक-सारीक जीवांच्या जीवनावर मानवनिर्मित प्रकाशाच्या प्रदूषणाने कसा विपरीत परिणाम होतो, याचे हे जिवंत उदाहरण होय. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, किरणोत्साराचे प्रदूषण इत्यादी प्रदूषणे आपल्याला माहीत ...

जगभर पर्यटकांच्या विरोधात आंदोलने का होत आहेत?

इमेज
जगभरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पर्यटन वाढण्यामागे अनेक घटक जबाबदार आहेत. अनेक देशांमध्ये लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यामुळे लोकांना प्रवास आणि पर्यटनासाठी अधिक पैसे खर्च करता येत आहेत. विमान कंपन्यांमधील स्पर्धेमुळे विमान प्रवासाचे दर कमी झाले आहेत, ज्यामुळे विमानाने प्रवास करणे अधिक परवडणारे बनले आहे. अनेक देशांनी व्हिसा प्रक्रियेला सुलभ आणि सोयीस्कर बनवले आहे, ज्यामुळे पर्यटकांना व्हिसासाठी अर्ज करणे आणि मिळवणे सोपे झाले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जगभरातील पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणे आणि त्यांचा प्रचार करणे सोपे झाले आहे. लोकांना आता प्रवास आणि पर्यटनाची प्रेरणा देण्यासाठी प्रेरणादायी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सहजपणे शेअर केले जाऊ शकतात. अनेक नवीन आणि अनोखी पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, ज्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत. लोक आता वस्तू खरेदी करण्यापेक्षा अनुभवांवर अधिक पैसे खर्च करण्यास इच्छुक आहेत आणि प्रवास हा एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा उत्तम मार्ग आहे. अनेक लोक आता आरोग्य आणि कल्याणासाठी प्रवास करतात, ज्यामुळे स्प...

उष्णतेमुळे एअर कंडिशनर्स धोकादायक व निरुपयोगी ठरतील

इमेज
उष्णता खूप वाढल्याने कुलर्स, एअर कंडिशनर्स, शीतपेये इत्यादीचा उपयोग आपण मोठ्या प्रमाणात करतो. पण हे तात्पुरते उपाय झालेत. खरे तर कुलर्स, एअर कंडिशनर्स, शीतपेये इत्यादी वापरल्यामुळे आपल्याला काही वेळ बरे वाटते; पण त्यामुळे जागतिक तापमान अधिक वेगाने वाढते. पर्यायाने हे उपाय करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे होय, आपल्या पर्यावरणाची हानी करणे होय, पृथ्वीचे वातावरण अधिक बिघडवणे होय. त्यातही अधिक गंभीर परिणाम म्हणजे उष्णता अशीच वाढत राहिली तर एअर कंडिशनर्स, कुलर्स यांचे अपघात वाढतील, त्यातील बिघाडसुद्धा वाढतील. त्याही पलीकडे म्हणजे ते निरुपयोगी useless ठरतील. थंड निवाऱ्याचा हक्क - कामगार, बेघर लोक, कमी उत्पन्न असणारे लोक, मध्यम वर्गीय लोक आणि असंघटित मजुरांना प्राणघातक उष्णतेचा सर्वाधिक फटका बसतो आहे. त्यांना विजेची वाढती बिले भरणे किंवा बिघडलेले ए.सी पुन्हा-पुन्हा दुरुस्त करणे परवडत नाही. अमेरिकेत उन्हाळ्यात लोकांना थंड निवारा देणे ही स्थानिक आणि राज्य सरकार यांची जबाबदारी आहे. उन्हाळ्यातील थंड निवारा हा तेथील लोकांचा कायदेशीर अधिकार मानला आहे. आपल्या संविधानात देखील सुरक्षित ...

उन्हाळ्यात घरे थंड ठेवण्यासाठी काय करावे? (एअर कंडीशनर आणि डेझर्ट कुलर यांच्याशिवाय)

इमेज
उन्हाळ्यात घरे थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत. एअर कंडीशनर आणि डेझर्ट कुलर व्यतिरिक्त, तुम्ही खालील पर्याय वापरून तुमचे घर थंड आणि आरामदायी ठेवू शकता: OpenMedia घरातील दिवे बंद ठेवा. दिवे उष्णता निर्माण करतात, त्यामुळे गरजेनुसारच दिवे वापरा. गरम पाण्याचा वापर कमी करा. गरम पाण्याचा वापर कमी करून तुम्ही घरातून उष्णता कमी करू शकता. गरम हवामानात थंड पाण्याने स्नान करा. त्यामुळे वातावरणात तेवढी उष्णता रोखली जाईल. तसेच पाणी गरम करण्यास लागणारी वीज किंवा गॅस वाचेल. त्यांच्या निर्मितीसाठी लागणारी ऊर्जा, कोळसा इत्यादीची बचत होईल. घरात गार पाण्याची खड्डी (Ravine) ठेवा. खड्डी म्हणजे अरुंद पण उभट असे मातीचे भांडे. त्यातील पाणी पृष्ठभागावर येऊन त्याची वाफ होते. घरातील वातावरण काहीतरी प्रमाणात थंड होऊ शकते. घरात गार पाण्याने भिजवलेले कपडे एक-दोन ठिकाणी जरी लटकवले तरी ते घरातील तापमान कमी करण्यासाठी व आर्द्रता वाढवण्यासाठी मदत करतात. गालिचे आणि कॅपेट उष्णता रोखतात म्हणून घरातील गालिचे आणि कारपेट काढून टाका. सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाश घरात येऊ द्या आणि दुपारच्या वेळी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. ph...

डेझर्ट कुलर्स – कमी वीज लागणारा व एअर कंडीशनरपेक्षा स्वस्त (घरी बनवणेही शक्य)

इमेज
धातूच्या पत्र्यांपासून बनवलेला कुलर  उन्हाळ्यात तापमान खूप जास्त असते. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी आणि पंखा यांच्या मदतीने बनवलेला डेझर्ट कुलर' हा एक पारंपारिक आणि लोकप्रिय पर्याय आहे. हे पाणी आणि पंखे वापरून तयार केलेले एक पारंपारिक थंड हवेचे उपकरण आहे. इतिहास - इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून चीनमध्ये पाणी आणि पंख्याचा वापर करून गार केलेल्या खोल्यांचे उल्लेख सापडतात. पाश्चिमात्य संशोधकांमध्ये १७५८ मधील बेन्जामिन फ्रँकलिन आणि जॉन हेडली यांचा बाष्पीभवनाचे तत्त्व वापरून वातानुकूलन करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. भारतात कुलरची उत्पत्ती 19 व्या शतकात झाली असे मानले जाते. त्यावेळी, ब्रिटीश राजवटीत, मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध होता. नागपूर हे मध्य प्रांताची राजधानी होते. तेथील उच्च दर्जाच्या अधिकार्‍यांना उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी विशेष प्रकारचे "पंखे" वापरले जात होते. तसेच लोक घरे थंड ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचे पर्याय शोधत होते. त्यातून  पाणी आणि पंखा यांच्या मदतीने बनवलेला कुलर हा एक प्रभावी आणि स्वस्त पर्याय बनला. डेझर्ट कुलर घरीही बनवता येतो...  MR HK Expe...

एअर कंडिशनरच्या अपघातांमागील कारणे व उपाय.

इमेज
उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये गुरुवारी (30 मे) एका सोसायटीमध्ये आग लागली होती. एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं 10-12 एसीच्या स्फोटाच्या घटना घडल्याची माहिती नोएडा फायर ब्रिगेडचे अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली. 27 मे रोजी मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील एका फ्लॅटमध्ये अशाप्रकारची घटना घडली होती. या घटनेत तर संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला होता 31 मे रोजी मेरठ मेडिकल कॉलेज च्या AC में स्फोट होऊन गायनिक वॉर्डमध्ये ऑपरेशन थिएटर आग लागली. 2 एसी च्या वायरिंग मध्ये 6 AC चालवत होते. इंदौर येथे २८ मे रोजी पाचव्या मजल्यावर कोम्प्रेसरचा स्फोट झाल्याने एक फ्लॅट जळून खाक झाला. अशा अनेक बातम्या तुम्ही पण वाचल्या, ऐकल्या असतीलच. प्रचंड गर्मीमुळं काही एअर कंडिशनर (एसी) वापरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. परंतु त्यासोबतच एसीमध्ये स्फोट होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आलीय. या घटनांमुळे एअर कंडिशनर/ एसीचा सुरक्षित वापर कसा करावा आणि दुर्घटना घडल्यास सुरक्षिततेचे कोणते उपाय करावे यावर माहिती असणे आवश्यक आहे. एसीचे अपघात वाढण्याची कारणे – एसीनं खोली थंड होण्यासाठी बाहे...

Dummy Post

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nullam vel eros eleifend, semper dolor sit amet, iaculis purus. Maecenas viverra fringilla molestie. Donec ut dignissim libero. Mauris laoreet euismod nisl, nec facilisis justo placerat vel. Vivamus eu maximus tellus, et ullamcorper libero. Aliquam non eros consequat, laoreet nibh ac, porta lacus. Morbi vitae turpis at enim pharetra eleifend. Sed pretium sapien id rutrum accumsan. Vestibulum hendrerit malesuada nibh, in efficitur magna mattis a. Vestibulum ut fermentum ante. Morbi fermentum, purus at hendrerit varius, elit dui semper risus, in ullamcorper sapien mauris sit amet sem. Phasellus ut odio consectetur, ornare justo ac, pretium magna. Cras tincidunt eros in tellus consequat, eu rhoncus justo congue. Praesent sodales enim ut augue pellentesque, vel efficitur ex cursus. Donec nec orci ut lacus lobortis fringilla ut id risus. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia curae; Donec et d...