एअर कंडिशनरच्या अपघातांमागील कारणे व उपाय.


उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये गुरुवारी (30 मे) एका सोसायटीमध्ये आग लागली होती. एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं
10-12 एसीच्या स्फोटाच्या घटना घडल्याची माहिती नोएडा फायर ब्रिगेडचे अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली.
27 मे रोजी मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील एका फ्लॅटमध्ये अशाप्रकारची घटना घडली होती. या घटनेत तर संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला होता
31 मे रोजी मेरठ मेडिकल कॉलेज च्या AC में स्फोट होऊन गायनिक वॉर्डमध्ये ऑपरेशन थिएटर आग लागली. 2 एसी च्या वायरिंग मध्ये 6 AC चालवत होते.
इंदौर येथे २८ मे रोजी पाचव्या मजल्यावर कोम्प्रेसरचा स्फोट झाल्याने एक फ्लॅट जळून खाक झाला.

अशा अनेक बातम्या तुम्ही पण वाचल्या, ऐकल्या असतीलच. प्रचंड गर्मीमुळं काही एअर कंडिशनर (एसी) वापरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. परंतु त्यासोबतच एसीमध्ये स्फोट होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आलीय. या घटनांमुळे एअर कंडिशनर/ एसीचा सुरक्षित वापर कसा करावा आणि दुर्घटना घडल्यास सुरक्षिततेचे कोणते उपाय करावे यावर माहिती असणे आवश्यक आहे.

एसीचे अपघात वाढण्याची कारणे –

एसीनं खोली थंड होण्यासाठी बाहेर असलेल्या कॉम्प्रेसरच्या आसपासचं तापमान त्याच्या कंडेनसरच्या तापमानापेक्षा सरासरी 10 अंशांनी कमी असायला हवं. भारतात वापरल्या जाणाऱ्या एसी कंडेनसरचं तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. जर बाहेरचं तापमान कंडेनसरच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर एसी व्यवस्थित काम करत नाही. कंडेनसरवरील दबाव वाढत जातो. त्यामुळं कंडेन्सरच्या स्फोटाची शक्यता वाढते.

कंडेनसरमधून गॅसची गळती होऊन जस-जसा गॅस कमी होत जातो, तसा कंडेन्सरवरचा दबाव वाढत जातो. त्यामुळे ते अधिक गरम होतं. परिणामी आग लागण्याची शक्यता वाढते.

एसीमध्ये वापरले जाणारे रेफ्रिजरंट यांची गळती होण्यास सुरुवात झाल्यास, ते हवेत मिसळू शकते आणि स्फोटक मिश्रण तयार करू शकते. चुकीच्या प्रकारचे रेफ्रिजरंट/ गॅस वापरल्यास ते एसीसाठी धोकादायक ठरू शकते आणि स्फोट होऊ शकतो.

एसीची कॉईल खराब झाली किंवा धुळीनं माखली तर गॅसच्या पुरवठ्याची समस्या निर्माण होते. त्यामुळं कंडेन्सर जास्त गरम होते. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते. फिल्टरची नियमित स्वच्छता नसल्यास एसीमध्ये धूळ आणि इतर कण साचू शकतात, ज्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि एसीवर ताण येतो. यामुळे स्फोट होऊ शकतो. एसीची नियमित तपासणी आणि मेंटेनन्स न केल्यास त्यातील घटक खराब होऊ शकतात आणि स्फोट होण्याची शक्यता वाढते.

एसीचा कॉम्प्रेसर सावलीत असेल, याची काळजी घ्यावी. कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर युनिटच्या जवळ हवा खेळती असायला हवी. चांगली हवा असेल तर ते जास्त गरम होत नाही.

व्होल्टेजमध्ये वारंवार चढ-उतार झाल्यास त्याचा कॉम्प्रेसरच्या कामावर परिणाम होतो. त्यामुळे दुर्घटना घडू शकते. अस्थिर वोल्टेज असल्यास, त्यात अचानक बदल झाल्यास एसीच्या इलेक्ट्रॉनिक घटकांना नुकसान होऊ शकते, ज्यामुळे स्फोट होऊ शकतो. अयोग्य वायरिंग मुळे स्फोट होण्याची शक्यता वाढते. एकाच सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त उपकरणे चालविल्याने एसीवर जास्त भार / ओव्हरलोड येऊ शकतो, ज्यामुळे स्फोट होऊ शकतो.

एसीच्या अपघातामागे याशिवाय इतर अनेक करणेही असू शकतात.

स्फोट टाळण्यासाठी काय करावे?

एसीचे तापमान खूप कमी ठेवू नका. 24°C ते 26°C च्या दरम्यान तापमान ठेवणे चांगले.
विश्वसनीय कंपनीचे आणि चांगल्या दर्जाचे एसी खरेदी करा.
एसी फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा.
एसी योग्य प्रकारे वापरा आणि सुरक्षाविषयक बाबींचे पालन करा.
अयोग्य रेफ्रिजरंट वापरण्यापासून सावध रहा. मान्यताप्राप्त शीतक गॅस वापरा
एसीमध्ये गळती झाल्यास तात्काळ बंद करा आणि तज्ञाची मदत घ्या.
एसीची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करा.
योग्य दर्जाचे वायर, प्लग, सॉकेट आणि सर्किट ब्रेकर वापरा.
व्होल्टेज रेग्युलेटर वापरा.
एसी योग्यरित्या स्थापित केले आहे याची खात्री करा.
आर्द्रता नियंत्रित करा. त्यासाठी ह्युमिडिफायर वापरून एसीमध्ये योग्य आर्द्रता राखा.
एसी वापरताना काळजी घ्या आणि कोणत्याही चुका टाळा.

-धनंजय आदित्य

(टीप- हा लेख संकलित माहितीवर आधारित आहे. वाचकांच्या सर्वसाधारण माहितीसाठी येथे दिला आहे. त्यावर कोणताही निर्णय घेतांना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Photo- Wikimedia Common + Open Media 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'चेलुवी' : मुलीचे फुलझाड बनते तेव्हा... निसर्गाची आणि स्त्रीत्वाची भावस्पर्शी लोककथा

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

पर्यावरण (Environment) आणि पारिस्थितिकी (Ecology)