आदिनामा Adinama
Mr. Dhananjay Aditya's Marathi articles. धनंजय आदित्य यांचे मराठी लेख.
(साईट तयार करणे सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पुन्हा भेट द्यावी ही विनंती.)
Monday, 22 January 2018
Thursday, 11 January 2018
न्यूटनच्या शोधांवर पुराणपंथी शिक्षणमंत्र्यांचा हातोडा!
अलीकडे शिक्षणमंत्री हे जोकरगिरी सुद्धा करतात असे दिसून येत आहे. अलीकडेच राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी असेच एक विधान करून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. जयपूर येथील राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसाच्या निमित्त ८ जानेवारी २०१८ रोजी केलेल्या भाषणात ते म्हणाले, “गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा शोध न्यूटनच्या हजार वर्षे आधी वराहमिहीर या भारतीय शास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे अभ्यासक्रमात न्यूटनच्या जागी ब्रह्मगुप्ताचे नाव लिहायला पाहिजे.” वृत्तपत्रांनी त्यांचे हे म्हणणे “वादग्रस्त विधान” म्हणून प्रकाशित केले, यातच त्यांच्या विधानाचा फोलपणा दिसून आला.
Sunday, 31 December 2017
भारतीयांचे पहिलेच शिक्षक प्रशिक्षण केंद्र
![]() |
पुणे
विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव
|
जोतीराव व सावित्रीमाई यांनी पुणे परिसरात कमीत कमी १८ शाळा काढल्या होत्या. या सर्व शाळांचे संचालन करण्याची जबाबदारी सावित्रीमाई यांच्यावर होती. ती त्यांनी लीलया पार पाडली. इतक्या शाळांचे संचालन करणारी इतिहासातील पहिली संचालिका म्हणून सावित्रीमाई यांचेच नाव घ्यावे लागते. एकापाठोपाठ शाळा काढल्यामुळे तेथे शिकवायला शिक्षक मिळत नव्हते. अशा शाळांमध्ये शिकवण्यासाठी सहसा उच्च वर्णीय शिक्षक तयार होत नसत.
‘सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य’ या पुस्तकाचे प्रास्ताविक
महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे कार्य पूर्णपणे एकजिनसी व अभिन्न आहे. हे दोन्ही महामानव क्रांतिकारी, अत्त्युच्च व श्रेष्ठतम होते. म्हणूनच आदराने जोती-सावित्री असा उल्लेख करण्यात येतो. भारतीय व जगाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ व अद्वितीय असे आहे. परंतु ज्यांनी अखिल समाजाच्या भल्यासाठी अपरिमित हाल सोसले, ज्यांच्या त्यागाची व कष्टाची फळे आपण आज हक्काने खातो... त्या जोती-सावित्री यांच्याविषयी लोकांना पुरेशी माहितीसुद्धा नाही असे दु:खद चित्र दिसून येते.
Saturday, 30 December 2017
Tuesday, 28 November 2017
पहिल्या शाळेचे महाकठीण ऐतिहासिक कार्य
(सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य: लेख-८)
=====================
मुलींसाठी शाळा काढणे हे त्यावेळी अत्यंत कठीण किवां अशक्यप्राय कार्य होते. स्त्रियांच्या शिक्षणाविषयी समाजात अनेक गैरसमज व अंधश्रद्धा पसरवल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्या काळी मुलींसाठी शाळा काढणे हे अत्यंत कठीण काम होते. परंतु जोतीराव व सावित्रींमाईनी ते काम मोठ्या कौशल्याने व धैर्याने तडीस नेले होते.
Subscribe to:
Posts (Atom)