उन्हाळ्यात घरे थंड ठेवण्यासाठी काय करावे? (एअर कंडीशनर आणि डेझर्ट कुलर यांच्याशिवाय)
उन्हाळ्यात घरे थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत. एअर कंडीशनर आणि डेझर्ट कुलर व्यतिरिक्त, तुम्ही खालील पर्याय वापरून तुमचे घर थंड आणि आरामदायी ठेवू शकता:
घरातील दिवे बंद ठेवा. दिवे उष्णता निर्माण करतात, त्यामुळे गरजेनुसारच दिवे वापरा.
गरम पाण्याचा वापर कमी करा. गरम पाण्याचा वापर कमी करून तुम्ही घरातून उष्णता कमी करू शकता.
गरम हवामानात थंड पाण्याने स्नान करा. त्यामुळे वातावरणात तेवढी उष्णता रोखली जाईल. तसेच पाणी गरम करण्यास लागणारी वीज किंवा गॅस वाचेल. त्यांच्या निर्मितीसाठी लागणारी ऊर्जा, कोळसा इत्यादीची बचत होईल.
घरात गार पाण्याची खड्डी (Ravine) ठेवा. खड्डी म्हणजे अरुंद पण उभट असे मातीचे भांडे. त्यातील पाणी पृष्ठभागावर येऊन त्याची वाफ होते. घरातील वातावरण काहीतरी प्रमाणात थंड होऊ शकते.
घरात गार पाण्याने भिजवलेले कपडे एक-दोन ठिकाणी जरी लटकवले तरी ते घरातील तापमान कमी करण्यासाठी व आर्द्रता वाढवण्यासाठी मदत करतात.
गालिचे आणि कॅपेट उष्णता रोखतात म्हणून घरातील गालिचे आणि कारपेट काढून टाका.
सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाश घरात येऊ द्या आणि दुपारच्या वेळी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
घराभोवती आणि खिडक्यांच्या जवळ झाडे लावा. झाडे उन्हापासून सुरक्षा देतात आणि घराभोवती थंड हवेचे वातावरण तयार करतात.
घरातील फर्निचर योग्य ठिकाणी ठेवा, जेणेकरून थंड हवा घरात येण्यास व हवा फिरण्यास अडथळा येणार नाही. घरात फक्त आवश्यक फर्निचर ठेवा. कमीत कमी फर्निचरमुळे वायुविजन सुधारते.
घरात नैसर्गिक रित्या हवा फिरती राहील याची काळजी घ्या. वायुविजन (Ventilation) चांगले असल्यास हवा चांगली मिळते.
छत आणि बाहेरील भिंतींवर सूर्यप्रकाश प्रतिबंधक रंग लावा. घराच्या बाहेरील भिंतींवर पांढरे किंवा हलके रंगाचे रंग लावा. हे रंग उष्णता परावर्तित करतात आणि घर थंड ठेवतात.
खिडक्यांच्या काचांवर सोलार कंट्रोल फिल्म लावा जी सूर्यप्रकाश कमी करते.
छतांवर गार्डन तयार करा. झाडे उष्णता शोषून घेतात आणि थंडावा आणतात.
पहाटेच्या वेळी, जेव्हा बाहेरील तापमान कमी असते, खिडक्या आणि दारे उघडा. त्यामुळे थंड हवा घरात येते.
-धनंजय आदित्य
(टीप- हा लेख संकलित माहितीवर आधारित आहे. वाचकांच्या सर्वसाधारण माहितीसाठी येथे दिला आहे. त्यावर कोणताही निर्णय घेतांना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
![]() |
| OpenMedia |
गरम पाण्याचा वापर कमी करा. गरम पाण्याचा वापर कमी करून तुम्ही घरातून उष्णता कमी करू शकता.
गरम हवामानात थंड पाण्याने स्नान करा. त्यामुळे वातावरणात तेवढी उष्णता रोखली जाईल. तसेच पाणी गरम करण्यास लागणारी वीज किंवा गॅस वाचेल. त्यांच्या निर्मितीसाठी लागणारी ऊर्जा, कोळसा इत्यादीची बचत होईल.
घरात गार पाण्याची खड्डी (Ravine) ठेवा. खड्डी म्हणजे अरुंद पण उभट असे मातीचे भांडे. त्यातील पाणी पृष्ठभागावर येऊन त्याची वाफ होते. घरातील वातावरण काहीतरी प्रमाणात थंड होऊ शकते.
घरात गार पाण्याने भिजवलेले कपडे एक-दोन ठिकाणी जरी लटकवले तरी ते घरातील तापमान कमी करण्यासाठी व आर्द्रता वाढवण्यासाठी मदत करतात.
गालिचे आणि कॅपेट उष्णता रोखतात म्हणून घरातील गालिचे आणि कारपेट काढून टाका.
सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाश घरात येऊ द्या आणि दुपारच्या वेळी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
![]() |
| photo- freerangestock |