पोस्ट्स

जलसंकटावर मात करणारा बेंगळुरू येथील एक पथदर्शी लोकप्रकल्प

इमेज
एकेकाळी तलावांचे शहर आणि गार्डन सिटी म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू शहर आज एका भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. या संकटावर मात करण्यासाठी बेंगळुरूमधील नागरिकांनी आणि काही स्वयंसेवी संस्थांनी मिळून एक आगळीवेगळी चळवळ सुरू केली आहे, ती म्हणजे अ मिलियन वेल्स फॉर बेंगळुरू (A Million Wells for Bengaluru). म्हणजे विशिष्ट प्रकारच्या दहा लाख विहिरी या शहरात खोदण्याचा प्रकल्प. उपक्रमाची पार्श्वभूमी: काळाची गरज अपुर्या पाणी-पुरवठ्यामुळे लोक भूजलाचा प्रचंड उपसा करू लागले. हजारो फूट खोल बोअरवेल्स खोदल्या गेल्या. त्यामुळे भूजल पातळी अत्यंत खालावली. या पार्श्वभूमीवर, बायोम एन्व्हायर्नमेंटल ट्रस्ट आणि फ्रेंड्स ऑफ लेक्स यांसारख्या संस्थांनी मिळून हा उपक्रम हाती घेतला. शहरात १० लाख विहिरी पुनर्भरण खोदण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. विहीर पुनर्भरण म्हणजे काय? विहीर पुनर्भरण या प्रकल्पात विहीर साधारणतः १० ते ३० फूट खोल असते आणि तिचा उद्देश पावसाचे पाणी जमिनीच्या पोटात उतरवणे हा असतो. घराच्या छतावर किंवा रस्त्यांवर पडणारे पावसाचे पाणी गाळून या विहिरींमध्ये सोडले जाते. हे पाणी थेट उथळ भूजल स्तरात ...

भारताच्या राष्ट्रपतींना डॉ. सुरेश खैरनार यांचे खुले पत्र: सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून घोषित करा

इमेज
आदरणीय राष्ट्रपती महोदया, मी तुम्हाला नम्र विनंती करतो की आपल्या देशात ३ जानेवारी हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून घोषित करावा. या दिवशी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती आहे. हा ऐतिहासिक दिवस अधिकृतपणे 'शिक्षक दिन' म्हणून ओळखला जावा अशी मी मनापासून प्रार्थना करतो. सावित्रीबाई फुले यांनी भारतात महिला आणि शूद्रांसाठी शिक्षणाचा पाया घातला. त्यांनी मनुस्मृतीविरुद्ध बंड केले. त्यात श्लोक ९.१८ मध्ये म्हटले आहे: “स्त्रियांसाठी मंत्रांसह कोणताही स्वतंत्र संस्कार विधी नाही; हा धर्मातील निश्चित नियम आहे. स्त्रिया शक्तीहीन आणि मंत्रांशिवाय आहेत.”मनुस्मृती असा आदेश देते की स्त्रियांसाठी विवाह हाच वैदिक संस्कार आहे. गुरूंकडून शिक्षणाची आवश्यकता नाही. पतीची सेवा करणे हेच तिचे गुरुकुल आणि घरकाम हाच तिचा होम आहे. हजारो वर्षे अशा आज्ञांमुळे स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे घट्ट बंद राहिलेत. पेशवाईच्या सनातनी विचारांचे केंद्र पुणे येथे सुमारे १८० वर्षांपूर्वी ज्योतिबा फुले आणि त्यांच्या जीवनसाथी सावित्रीबाई फुले यांनी या विचारसरणीविरुद्ध उघडपणे बंड केले. ...

धार्मिक कट्टरतेतून कौटुंबिक हिंसाचाराचे भीषण वास्तव

इमेज
गढीदौलतची काळी रात्र उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील गढीदौलत गावात अलीकडेच घडलेली घटना मानवी संवेदनशीलतेला हादरवून टाकणारी आहे. घराबाहेर जाताना केवळ बुरखा न घातल्याच्या कारणावरून एका इसमाने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींची निर्घृण हत्या केली व त्यांचे मृतदेह घरातच पुरून ठेवले. ही घटना धार्मिक कट्टरता, रूढीवादी विचार आणि टोकाची नियंत्रण मिळवण्याची प्रवृत्ती यांचे भयावह मिश्र ण होते. जेव्हा धर्माचा अतिरेकी अर्थ डोक्यात भिनतो तेव्हा त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात हे आपण अनेक ठिकाणी पाहत असतो. पण येथे धार्मिक कट्टरता कौटुंबिक आपुलकीचे बंध टराटरा फाडून टाकते हे भयंकर वास्तव आपणास दिसते. जगभरातील रक्तरंजित इतिहास भारतात 'ऑनर किलिंग'च्या नावाखाली अनेकदा रक्ताचे नातेवाईकच शत्रू बनल्याचे दिसते. मुस्लीम तरुणीशी प्रेमसंबंध असल्यामुळे दिल्लीतील अंकित सक्सेना (२०१८) या हिंदू तरुणाची तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी रस्त्यावर गळा चिरून हत्या केली. तेलंगणातील अमृता राव या तरुणीच्या उच्चवर्णीय हिंदू वडिलांनी (२०१८) आपल्या मुलीच्या दलित पतीची (प्रणय पेरूमल्ला) सुपारी देऊन हत्या केली. ...

धार्मिक कट्टरतेतील एककारणी भ्रम (मोनोकॉझल फलॅसी)

मोनोकॉझल फलॅसी, ज्याला आपण मराठीत एककारणी भ्रम किंवा एकमेव कारणाचा भ्रम म्हणतो. हा एक असा तर्कदोष आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या गुंतागुंतीच्या घटनेसाठी केवळ एकाच कारणाला जबाबदार धरते. वास्तव हे नेहमीच अनेक पदरांनी बनलेले असते आणि कोणत्याही छोट्या-मोठ्या बदलामागे अनेक घटकांचा परस्परसंबंध असतो. मात्र मानवी मेंदूला गुंतागुंत आवडत नसल्यामुळे तो सरधोपट मार्ग (short cut) निवडतो आणि सर्व दोषांचे खापर एकाच कारणावर फोडतो. धार्मिक कट्टरतेच्या बाबतीत हा भ्रम प्रकर्षाने जाणवतो. जेव्हा समाज एखाद्या समस्येसाठी फक्त धर्माला किंवा विशिष्ट शिकवणीला जबाबदार धरतो, तेव्हा तो त्यामागील सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाच्या अशा मानसिक-वैचारिक गुंतागुंतीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. अशी विचारपद्धती अत्यंत घातक ठरू शकते कारण ती आपल्याला समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यापासून रोखते आणि आपल्याला एका आभासी सत्याच्या जगात घेऊन जाते, जिथे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर केवळ एकच शब्द किंवा एकच घटक असतो. . एखाद्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे केवळ त्या धर्माच्या शिकवणीमुळे झाले असा निष्कर्ष काढला जातो. यात त्या हल...

सोशल मिडियावर फिरणाऱ्या माणेकशॉ, नेहरू यांच्या विषयीच्या खोट्या कथा

व्हॉटस्अॅप वर खालील पोस्ट फिरत असते- हिंदीतून, मराठीतून, इंग्रजीतून. तिची सत्यता पडताळून बघू या. ती पोस्ट अशी आहे- तुम्हाला पिन ड्रॉप ऐकू येतो का? पिन ड्रॉप सायलेन्सचा अर्थ काय आहे? खाली काही उदाहरणे दिली आहेत जेव्हा सायलेन्स आवाजापेक्षा जास्त बोलू शकते. १- फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांनी एकदा अहमदाबाद येथे एका जाहीर सभेला इंग्रजीत संबोधित करण्यास सुरुवात केली. जमाव ओरडला, "गुजरातीमध्ये बोला. तुम्ही गुजरातीमध्ये बोललात तरच आम्ही तुमचे ऐकू." असा घोष करू लागला. फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ थांबले. प्रेक्षकांना कडक नजरेने पाहिले आणि उत्तर दिले,"मित्रांनो, मी माझ्या दीर्घ कारकिर्दीत अनेक लढाया लढल्या आहेत. मी शीख रेजिमेंटच्या सैनिकांकडून पंजाबी शिकलो आहे; मराठा रेजिमेंटमधून मराठी; मद्रास रेजिमेंटमधून सैनिकांकडून तमिळ; बंगाल रेजिमेंटमधून सैनिकांकडून बंगाली, बिहार रेजिमेंटमधून हिंदी; आणि गुरखा रेजिमेंटमधून नेपाळी देखील. दुर्दैवाने गुजरातमधील असा कोणताही सैनिक नव्हता ज्याच्याकडून मी गुजराती शिकू शकलो असतो." एक पिन ड्रॉप सायलेन्स! २- १९४७ मध्ये ब्रिटिश राजवटीपासून...

'चेलुवी' : मुलीचे फुलझाड बनते तेव्हा... निसर्गाची आणि स्त्रीत्वाची भावस्पर्शी लोककथा

इमेज
'चेलुवी' हा १९९२ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट सुप्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केला आहे. (हा चित्रपट नंतर कन्नड भाषेतही डब करण्यात आला). मुख्य भूमिकेत असलेल्या सोनाली कुलकर्णी यांचा हा पहिला चित्रपट. सोबत सुषमा, गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पर्यावरण संवर्धन यावरील सर्वोत्तम चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता. हा चित्रपट कर्नाटक राज्यातील फुलणारे झाड- एका स्त्रीची कहाणी या पारंपारिक लोककथेवर आधारित आहे. हा चित्रपट निसर्ग, स्त्री आणि सामाजिक शोषण यावर गंभीर भाष्य करतो. संवेदनशील लोककथेवर आधारित चित्रपट 'चेलुवी' ही गरीब कुटुंबातील तरुणी आहे. ती आपल्या आई आणि बहिणीसोबत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहते. एका साधूने दिलेल्या मंत्रामुळे चेलुवीला एक गुप्त आणि जादुई शक्ती प्राप्त होते. ती स्वतःचे रूपांतरण एका सुगंधित फुलांनी बहरलेल्या झाडात करू शकते. पैसे मिळवण्यासाठी ती या मंत्राचा उपयोग करते. तिच्या झाडाला भरपूर सुगंधी फुले येतात. तिची बहीण अत्यंत काळजीपूर्वक ही फुले गोळा करते. दोघीही त...

झोपेतील अपसामान्य (abnormal) वर्तन – प्रत्येकाच्या उपयोगाचे लेखन

इमेज
झोपेवरील नकारात्मक परिणाम आजच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या जीवनशैलीमुळे मानवी झोपेवर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. पुरेशी व शांत झोप न मिळाल्यास अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक परिणाम दिसू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, हार्मोन्सचे संतुलन बिघडते, हृदयविकाराचा धोका वाढतो. चयापचय क्रिया बिघडते, मधुमेहाचा धोका वाढतो, झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. कामात लक्ष एकाग्र होत नाही, कामात चुका होतात, चिंता आणि नैराश्याची लक्षणे वाढतात, भावनिक लवचिकता कमी होते, अल्पकालीन स्मृतीवर परिणाम होतो. येथे आपण झोपेतील अपसामान्य वर्तन याची अंशतः माहिती घेऊ या. झोपेतील सामान्य वर्तन झोप हा मानवी जैविक कार्यप्रणालीचा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि चक्रीय स्वरूपाचा घटक आहे. मेंदूतील विविध न्यूरोकेमिकल प्रणाली, हार्मोन्स, विद्युतक्रियांचे नमुने आणि संज्ञानात्मक यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून पूर्ण झोपेचे चक्र तयार करतात. झोपेचे Non-REM आणि REM असे दोन प्रमुख टप्पे आहेत. REM म्हणजे Rapid Eye Motion यात डोळ्यातील बाहुली वेगाने हालचाल करीत असते. Non-...