डेझर्ट कुलर्स – कमी वीज लागणारा व एअर कंडीशनरपेक्षा स्वस्त (घरी बनवणेही शक्य)
![]() |
| धातूच्या पत्र्यांपासून बनवलेला कुलर |
उन्हाळ्यात तापमान खूप जास्त असते. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी आणि पंखा यांच्या मदतीने बनवलेला डेझर्ट कुलर' हा एक पारंपारिक आणि लोकप्रिय पर्याय आहे. हे पाणी आणि पंखे वापरून तयार केलेले एक पारंपारिक थंड हवेचे उपकरण आहे.
इतिहास -
इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून चीनमध्ये पाणी आणि पंख्याचा वापर करून गार केलेल्या खोल्यांचे उल्लेख सापडतात. पाश्चिमात्य संशोधकांमध्ये १७५८ मधील बेन्जामिन फ्रँकलिन आणि जॉन हेडली यांचा बाष्पीभवनाचे तत्त्व वापरून वातानुकूलन करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता.
भारतात कुलरची उत्पत्ती 19 व्या शतकात झाली असे मानले जाते. त्यावेळी, ब्रिटीश राजवटीत, मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध होता. नागपूर हे मध्य प्रांताची राजधानी होते. तेथील उच्च दर्जाच्या अधिकार्यांना उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी विशेष प्रकारचे "पंखे" वापरले जात होते. तसेच लोक घरे थंड ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचे पर्याय शोधत होते. त्यातून पाणी आणि पंखा यांच्या मदतीने बनवलेला कुलर हा एक प्रभावी आणि स्वस्त पर्याय बनला.
डेझर्ट कुलर घरीही बनवता येतो... MR HK Experiment या चॅनेल वरील विडिओ महितीसाठी देत आहे. लिंक- https://www.youtube.com/watch?v=2mlhofi4gJ8
डेझर्ट कुलरची रचना -
असा कुलर बनवण्यासाठी, लाकडी किंवा धातूच्या फ्रेम बनवल्या जातात. त्याच्या उभ्या/ vertical फ्रेमवर त्यावर 'खस' किंवा 'गारपाटी' पासून बनवलेले चटईसारखे पडदे लावले जातात. या पडद्यावर वरून पाणी सोडले जाते. पंखा फिरायला लागला की हवा या पडद्यामधून जाते. ही थंड हवा घरात पसरते आणि वातावरण थंड होते.
यांना डेजर्ट कूलर म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये खाली पाणी ठेवण्यासाठी पत्र्याचा ट्रे असतो. त्यातील पाणी छोट्याशा पंपाने वरच्या ट्रे मध्ये सोडले जाते. ते पाणी तीनही बाजूच्या पडद्या वरून खाली येते व त्यामुळे हवा थंड होते. हे कुलर्स अलीकडे प्लॅस्टिक स्ट्रक्चर वापरुन बनवले जातात. ते तुलनेने जास्त टिकतात. यांना टॉवर कुलर असेही म्हणतात. पोर्टेबल कुलर हे हलके आणि फिरणारे कुलर आहेत. त्यांची कार्यपद्धती डेझर्ट कूलर प्रमाणे असते. घराच्या कोणत्याही भागात ठेवले जाऊ शकतात.
![]() |
| प्लास्टिक बॉडी वापरून बनवलेला कुलर |
फायदे
हे कुलर हे इतर एअर कंडीशनिंग पर्यायांपेक्षा कमी वीज वापरतात. ते बनवण्यासाठी आणि वापरण्यासाठी स्वस्त आहेत. ते पर्यावरणासाठी चांगले आहेत कारण ते थोड्या प्रमाणात ऊर्जा वापरतात. ते दुरुस्त करणे पर्यायाने सोपे आणि स्वस्त आहे. ते वातावरणातील आर्द्रता वाढवतात, त्यामुळे उन्हाळ्यात आरामदायी वातावरण निर्माण होते. एअर कंडीशनरच्या तुलनेत ते कमी कार्यक्षम असतात.
तोटे
यांना काम करण्यासाठी सतत पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यावेळी हे कुलर्स निरुपयोगी ठरतात. ते मोठ्या घरांसाठी किंवा खूप उष्ण हवामानासाठी अपुरे ठरतात. यांना नियमितपणे स्वच्छ करणे आणि मेंटेनन्सची आवश्यकता असते. ते वातावरणातील आर्द्रता वाढवतात, ज्यामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो. पाणी भरतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. वायरिंग योग्य नसल्यास त्यातून इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो.

