पोस्ट्स

Health लेबलसह पोस्ट दाखवत आहे

झोपेतील अपसामान्य (abnormal) वर्तन – प्रत्येकाच्या उपयोगाचे लेखन

इमेज
झोपेवरील नकारात्मक परिणाम आजच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या जीवनशैलीमुळे मानवी झोपेवर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. पुरेशी व शांत झोप न मिळाल्यास अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक परिणाम दिसू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, हार्मोन्सचे संतुलन बिघडते, हृदयविकाराचा धोका वाढतो. चयापचय क्रिया बिघडते, मधुमेहाचा धोका वाढतो, झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. कामात लक्ष एकाग्र होत नाही, कामात चुका होतात, चिंता आणि नैराश्याची लक्षणे वाढतात, भावनिक लवचिकता कमी होते, अल्पकालीन स्मृतीवर परिणाम होतो. येथे आपण झोपेतील अपसामान्य वर्तन याची अंशतः माहिती घेऊ या. झोपेतील सामान्य वर्तन झोप हा मानवी जैविक कार्यप्रणालीचा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि चक्रीय स्वरूपाचा घटक आहे. मेंदूतील विविध न्यूरोकेमिकल प्रणाली, हार्मोन्स, विद्युतक्रियांचे नमुने आणि संज्ञानात्मक यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून पूर्ण झोपेचे चक्र तयार करतात. झोपेचे Non-REM आणि REM असे दोन प्रमुख टप्पे आहेत. REM म्हणजे Rapid Eye Motion यात डोळ्यातील बाहुली वेगाने हालचाल करीत असते. Non-...

मायक्रोस्लीप: अचानक येणारी क्षणभऱ्याची धोकादायक झोप

इमेज
एक क्षण. डोळे मिटले फक्त काही सेकंदांसाठी आणि आयुष्य मात्र कायमचे काळवंडले. ही धोकादायक झडप म्हणजे- मायक्रोस्लीप -म्हणजेच क्षणभराची झोप- हा शब्द ऐकताना तो किरकोळ वाटतो, पण वास्तवात त्याने कित्येक जीव घेतले आहेत. आपल्या आजूबाजूला, महामार्गांवर, रेल्वे ट्रॅकवर, अगदी आकाशातही या क्षणिक झोपेचे गंभीर परिणाम घडले आहेत. . २०१७ मध्ये भारतातील यमुना एक्सप्रेसवेवर एका बसचालकाला फक्त काही सेकंद झोप लागली आणि बस दरीत कोसळली आणि २२ प्रवाशांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात २०२३ मध्ये कोल्हापूर-निपाणी महामार्गावर ट्रकचालकाच्या झोपेमुळे झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. अमेरिकेत २००९ साली एअर फ्रान्स ४४७ च्या विमान अपघाताच्या प्राथमिक कारणांपैकी एक कारण म्हणजे पायलटची क्षणाची झोप आणि मेंदूची प्रतिक्रिया मंदावणे होते. जपानच्या शिन्कान्सेन रेल्वेच्या इतिहासात एकदा चालकाला फक्त काही सेकंद झोप लागली आणि संपूर्ण ट्रेन काही किलोमीटरपर्यंत नियंत्रणाविना धावत राहिली. . २०१६ मध्ये मुंबई-नाशिक महामार्गावर, ट्रकचालकाच्या मायक्रोस्लीपमुळे झालेल्या अपघातात सहा वाहनांची एकमेकांना धडक बसली, जणू चेन रिऍक्शन झाली. जागतिक ...

शिक्षकी पेशातील व्यावसायिक धोके आणि उपाय

इमेज
शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक आणि विचारवंत असतात. त्यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी थेट जोडलेले असते. मात्र या उदात्त व्यवसायामागे काही गंभीर व्यावसायिक धोके Occupational Hazards असतात. ते त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य आणि कार्यक्षमता यावर परिणाम करतात. . शिक्षकांना दररोज वर्गात मोठ्याने आणि सतत बोलावे लागते. यामुळे त्यांच्या स्वरयंत्रावर ताण येतो, आवाज बसणे, घसा खवखवणे किंवा “व्हॉईस डिसऑर्डर” सारख्या विकारांचा धोका निर्माण होतो. याशिवाय, वर्गात वापरल्या जाणाऱ्या खडूच्या धुळीमुळे आणि गर्दीच्या बंद वर्गांतील दूषित हवेने श्वसनाचे त्रास, अॅलर्जी आणि दम्याचे विकार होऊ शकतात. . फळ्यावर खडूने लिहिणे ही पारंपरिक आणि सोपी पद्धत असली तरी तिच्यातून निर्माण होणारी धूळ अत्यंत सूक्ष्म रासायनिक कणांनी बनलेली असते. हे कण हवेत दीर्घकाळ तरंगत राहतात आणि शिक्षकांच्या श्वासावाटे फुफ्फुसात प्रवेश करतात. ही धूळ शिक्षकांच्या फुफ्फुस, डोळे आणि त्वचेवर गंभीर परिणाम करते. सूक्ष्म धूळकण फुफ्फुसात जाऊन अॅलर्जिक ब्रॉंकीटिस किंवा सिलिकोसिस अशा गंभीर समस्या निर्माण करू शकतात. फुफ्फुसांची ...

सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ शंतनू अभ्यंकर कालवश

इमेज
विनम्र आदरांजली   सुप्रसिद्ध विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे वयाच्या ६० व्या वर्षी गुरुवारी दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. शंतनू अभ्यंकर यांना फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णायलात उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्याने साहित्य, समाजसेवा, वैद्यकीय आणि कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी,आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, अशी विविध विषयांवरील खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्यामागे वडील डॉ. शरद अभ्यंकर, आई मीराताई, एक भाऊ, पत्नी डॉ. रूपाली, मुलगा डॉ. मोहित, विवाहित मुलगी डॉ. अनन्या, नात असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी रुपाली या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत. त्यांचा मुलगा मोहित नि मुलगी अनन्या दोघे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. + वरील व्हिडिओ Against All Odds: The Journey of Dr. Shantanu Abhyankar I Smiling Through Adversity हा - Davprabha Films & Productions या चैनेल वरील आहे. शंतनू अभ्यंकर यांचा जन्म १४ एप्रिल १९६४ रोजी झाला. त्यांनी पुण्यातील बैरामजी जीजीभ...

मला कोरोनाचा संसर्ग झाला तर...

इमेज
आज संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान मांडले आहे. महाशक्ती म्हणून मिरवणाऱ्या देशांनीही कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत. दररोज हजारो लोक कोरोंनामुळे बळी जात आहेत. अशा परिस्थितीत कोणालाही, केव्हाही व कोठेही कोरोनाचा संसर्ग (Corona virus infection) होऊ शकतो- ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी " मला कोरोनाचा संसर्ग झाला तर...?" असा विचार भल्याभल्यांच्या मनात डोकावून जातो आणि त्यांच्या काळजात चर्र होऊन जाते.

Dummy Post

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nullam vel eros eleifend, semper dolor sit amet, iaculis purus. Maecenas viverra fringilla molestie. Donec ut dignissim libero. Mauris laoreet euismod nisl, nec facilisis justo placerat vel. Vivamus eu maximus tellus, et ullamcorper libero. Aliquam non eros consequat, laoreet nibh ac, porta lacus. Morbi vitae turpis at enim pharetra eleifend. Sed pretium sapien id rutrum accumsan. Vestibulum hendrerit malesuada nibh, in efficitur magna mattis a. Vestibulum ut fermentum ante. Morbi fermentum, purus at hendrerit varius, elit dui semper risus, in ullamcorper sapien mauris sit amet sem. Phasellus ut odio consectetur, ornare justo ac, pretium magna. Cras tincidunt eros in tellus consequat, eu rhoncus justo congue. Praesent sodales enim ut augue pellentesque, vel efficitur ex cursus. Donec nec orci ut lacus lobortis fringilla ut id risus. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia curae; Donec et d...