पोस्ट्स

Science लेबलसह पोस्ट दाखवत आहे

झोपेतील अपसामान्य (abnormal) वर्तन – प्रत्येकाच्या उपयोगाचे लेखन

इमेज
झोपेवरील नकारात्मक परिणाम आजच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या जीवनशैलीमुळे मानवी झोपेवर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. पुरेशी व शांत झोप न मिळाल्यास अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक परिणाम दिसू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, हार्मोन्सचे संतुलन बिघडते, हृदयविकाराचा धोका वाढतो. चयापचय क्रिया बिघडते, मधुमेहाचा धोका वाढतो, झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. कामात लक्ष एकाग्र होत नाही, कामात चुका होतात, चिंता आणि नैराश्याची लक्षणे वाढतात, भावनिक लवचिकता कमी होते, अल्पकालीन स्मृतीवर परिणाम होतो. येथे आपण झोपेतील अपसामान्य वर्तन याची अंशतः माहिती घेऊ या. झोपेतील सामान्य वर्तन झोप हा मानवी जैविक कार्यप्रणालीचा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि चक्रीय स्वरूपाचा घटक आहे. मेंदूतील विविध न्यूरोकेमिकल प्रणाली, हार्मोन्स, विद्युतक्रियांचे नमुने आणि संज्ञानात्मक यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून पूर्ण झोपेचे चक्र तयार करतात. झोपेचे Non-REM आणि REM असे दोन प्रमुख टप्पे आहेत. REM म्हणजे Rapid Eye Motion यात डोळ्यातील बाहुली वेगाने हालचाल करीत असते. Non-...

“वैज्ञानिक दृष्टीकोन दिना”ची कुळकथा

इमेज
वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसाराचे उल्लेखनीय भरीव कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी "राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन" म्हणून अंमलात आणायचा असे ठरले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी झटत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी असे कार्य करणारे हजारो लोक महाराष्ट्रात तयार केले. Original Photo From BBC News २०१८ साली २८ फेब्रुवारीला “राष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा करण्यात आला. विज्ञान दिवस म्हणजे विज्ञानाचे प्रयोग मांडणे, विज्ञानाची प्रगती सांगणे अशा प्रकारे सामान्यतः सगळीकडे तो साजरा केला जातो. त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेल्या गोष्टी, उपचार त्या कार्यक्रमात केले जातात असेही आढळून आले. एका प्रतिथयश शाळेत अंधश्रद्धाळू कर्मकांडासह हा विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्याची बातमी फोटोसह "अंधश्रद्धा निर्मुलन" हे बिरूद लावलेल्या एका ग्रुपवर आयोजकांनी टाकली. त्यावर माझे आक्षेप मी स्पष्टपणे मांडले. परंतु त्यातील कर्मकांडाचे व अवैज्ञानिक उपचारांचे समर्थन स्युडो-सायंटिफिक कारणे देऊन आयोजक मंडळीतर्फे...

चमत्कारांचा व्यापार - डॉ. प्रदीप पाटील

इमेज
स्वामी, महाराज, बुवा आणि गुरू यांच्या कहाण्याच्या कहाण्या रचल्या गेल्यात व जाताहेत..   या कहाण्या ज्या काळात रचल्या गेल्या त्या काळात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्णपणे मेलेला होता आणि आजही तो मारण्याचे काम सुरू आहे! कारण या कहाण्यांमध्ये.. चरित्रांमध्ये.. गाथांमध्ये.. अत्यंत अवैज्ञानिक चमत्कार ठासून भरलेले आहेत!   आजच्या टीव्हीवरील मालिका या गाथा आणि ग्रंथांवर आधारलेल्या असतात, ज्यात ठासून चमत्कार तर असतातच, शिवाय कोणताही मागमूस आणि पुरावा नसलेल्या गोष्टी सतत दाखवलेल्या आढळतात. आणि या सर्व स्वामी, गुरु, महाराज, दादा, मामा, आणि बुवा यांची चरित्रं, त्यांच्या गाथा, त्यांचे प्रवचन आणि त्यांचे ग्रंथ या सगळ्यांमध्ये समान चमत्कार आढळतात!!   चमत्कार केल्याशिवाय कोणताही बुवा आणि महाराज किंवा स्वामी हा प्रचंड प्रसिद्ध झालेला नाही आणि त्याच्या मागे लाखो भोळे लोक भक्त बनून लागलेले नाहीत. चमत्काराला नमस्कार असतो हेच खरे असते. अशा या चमत्कारांची एक यादी समान तऱ्हेने सगळीकडे आढळते...   सर्वप्रथम दिसते असे की हे महाराज अचानक प्रकट झालेले असतात! त्यांचे जन्म ठिकाण, त्यांचे आधा...