भोंदू बुवा-बाबा यांचा भांडाफोड करणाऱ्या सुहानी शाहला 'जादू च्या ऑलंपिक' मध्ये जागतिक दर्जाचे सुवर्ण पदक

भोंदू बुवा-बाबा यांचा भांडाफोड करणाऱ्या सुहानी शाहला 'जादू च्या ऑलंपिक' मध्ये जागतिक दर्जाचे सुवर्ण पदक = धनंजय आदित्य ============. सुहानी शाह ही भारतातील प्रसिद्ध मेंटलिस्ट, जादूगार आणि यूट्यूबर आहे. ती आपल्या कार्यक्रमांमधून लोकांचे मन वाचल्यासारखे दाखवते, परंतु यामागे कोणतीही अदृश्य किंवा 'दिव्य' शक्ती नसते. ती स्पष्टपणे सांगते की हे सर्व तिच्या निरीक्षणशक्ती, मानसशास्त्रातील ज्ञान आणि सर्जनशील मेंटल ट्रिक्समुळे शक्य होतं. तिचा उद्देश केवळ मनोरंजन नसून लोकांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी रुजवणे हा आहे. त्यामुळे ती अनेकदा अंधश्रद्धा, भोंदूबाबा आणि खोट्या चमत्कारांचा प्रखर विरोध करत असते. बागेश्वर बाबा यांच्याशी संघर्ष बागेश्वर धामचे प्रमुख, धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा, हे स्वतःला धर्मगुरू आणि दिव्यशक्तीचे धारक मानतात. ते 'दिव्य दरबार'मध्ये लोकांची माहिती सांगतात, त्यांच्या समस्या कथितरीत्या ओळखतात आणि उपाय सांगतात. त्यांच्या या कृतीमुळे अनेकांना त्यांच्यावर श्रद्धा वाटते. मात्र, याच कृतींमुळे अनेक अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते आणि विचारवंत त्यांच्यावर टीका ...