Tuesday, June 2, 2020

साहेब, मला तुरुंगातच ठेवा!

कोरोनाव्हायरसने जगात सर्वत्र हाहाकार उडवून टाकला. उद्योगधंदे, वाहतूक इत्यादी सगळे बंद झाल्यामुळे अर्थव्यवस्थाही डबघाईला आली. सर्व देशांच्या सर्व सरकारी यंत्रणा कामाच्या व खर्चाच्या प्रचंड भाराने मोडकळीस आल्या. त्यामुळे सरकारी यंत्रणावरचा ताण कमी करायचा प्रयत्न सरकार करायला लागले. त्याचाच भाग म्हणून सरकारने एक फर्मान काढले की- तुरुंगातील कैदी कमी करायचे, ज्या कैद्यांना पॅरोल किंवा ज्या कोण्या प्रकारे मुक्त करता येईल त्या प्रकारे मुक्त करायचे.

Friday, May 29, 2020

मला कोरोनाचा संसर्ग झाला तर...


आज संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान मांडले आहे. महाशक्ती म्हणून मिरवणाऱ्या देशांनीही कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत. दररोज हजारो लोक कोरोंनामुळे बळी जात आहेत. अशा परिस्थितीत कोणालाही, केव्हाही व कोठेही कोरोनाचा संसर्ग (Corona virus infection) होऊ शकतो- ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी " मला कोरोनाचा संसर्ग झाला तर...?" असा विचार भल्याभल्यांच्या मनात डोकावून जातो आणि त्यांच्या काळजात चर्र होऊन जाते.